Global Handwashing Day हँडवॉशचं महत्व..
सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळं काही विस्कळीत झाले आहे. कोरोनाच्या दुष्प्रभावापासून वाचण्यासाठी सामाजिक अंतर राखणं, मास्क लावणं आणि वारंवार हात धुणं हेच उपाय कामी येत आहे.
आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत गोष्ट एका मॉन्टीची जो सगळ्यांना हात धुण्यासाठी सुचवायचा. पण त्याला स्वतःला हात न धुतल्यामुळे मोठी किंमत मोजावी लागली. हे कसे काय घडलं जाणून या.
एकदा शाळेत जाण्यासाठी रॉनी तयार झाला होता. बस मुलांना घेण्यासाठी येणारच होती. तेवढ्याच समोरून रॉनीला शेंकीची आई येताना दिसते. रॉनी त्यांना विचारतो की काकू शेंकी शाळेत जायला येणार आहे न ?
शेंकीची आई रॉनीला सांगते की नाही रे बाळा, आज तो शाळेत येणार नाही आज आम्हाला त्याचा मामे भावाला बघायला दवाखान्यात जायचे आहे. तो गेल्या 3- 4 दिवसा पासून आजारी आहे. अरे मॉन्टीला अचानक काय झालं ? रॉनीने विचारले.
त्याला अन्नातून विषबाधा झालेली आहे.
कसं काय विचारता शेंकीची आई म्हणाली की बाळ आजच्या तुम्हा मुलांना बाहेरचे खायची फार वाईट सवय लागली आहे, त्यामुळे घरातील बनलेल्या वस्तू तुम्हा मुलांना आवडत नाही त्यामुळे बाहेरहुन काही ही आणतात आणि त्याला तसेच हात न धुता खातात. फळे किंवा इतर वस्तू देखील हात न धुता खातात.
पण काकू त्याने तर त्याचा शाळेत झालेल्या व्रक्तुत्व स्पर्धेत पहिला नंबर पटकवला होता. ज्याचे विषय होते 'हात धुण्याचं महत्व'
होय रे बाळा, पण असे म्हणतात की 'दुसऱ्याला वाटे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरे पाषाण' म्हणजे दुसऱ्यांना हँडवॉशचं महत्व सांगता सांगता स्वतः कधी ही हँडवॉश करतं नसे. त्याला घरातील सर्व समजवायचे की अरे बाळा काही ही खाण्याच्या पूर्वी जिन्नसला आणि स्वतःच्या हाताला धुवून घेत जा. पण त्याने आमच्या सगळ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. आणि आज आजारी होऊन दवाखान्यात भरती आहे. त्याचा केलेल्या कृतीचा त्रास आज संपूर्ण घराला होत आहे.
पण काकू तो स्वतः तर आधी ही काळजी घेत असायचा दिवसातून कित्येक वेळा आपले हात धुवायचा तरी ही त्याला कसे काय झालं ?
ज्या वेळे पासून त्याचा त्या स्पर्धेत नंबर आलेला. तेव्हा पासून तो स्वतःला हुशार समजायचा आणि मला काही होणार नाही असा गर्व करू लागला. त्याचे परिणाम म्हणजे की तो आजारी पडला त्याने सगळं दुर्लक्ष केलं, असं काकू म्हण्याला.
म्हणून कोठून देखील बाहेरून आल्यावर किंवा काही खायचे असल्यास सर्वात आधी आपले हात आणि पाय स्वच्छ धुवून घ्या. आणि कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यास आपले हात स्वच्छ धुवावे. असे केल्यानं आपल्या हातातील जंत नाहीसे होतात आणि ते आपल्या तोंडातून पोटात जात नाही. आणि जर का आपण आपले हात वारंवार धुतले नाही तर ते जंत आपल्या तोंडातून आपल्या पोटात जाऊन आपल्याला आजारी करू शकतात. आणि मग आपल्याला कडू औषध घ्यावे लागतात. असे होऊ नये म्हणून दिवसातून बऱ्याच वेळा आपले हात धुवावे. आणि फळे भाज्या धुवूनच खाव्या. तर मग मुलांनो आपल्या देखील समजलंच असणार की ' हँडवॉशचं महत्व' काय आहेत ते, मग आपले हात वारंवार स्वच्छ करणार न. आपले हात काहीही खाण्यापूर्वी स्वच्छ धुणार न. जेणे करून आपण निरोगी राहू शकाल.