मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (09:46 IST)

चिमूटभर मीठ आपल्याला राहूच्या दुष्प्रभावातून मुक्त करणार

मिठाशी निगडित काही वास्तू उपाय करून आपण तणाव आणि आजारापासून मुक्त होऊ शकतात. एखाद्या खाद्य पदार्थाला किती देखील मसाले घालून चवदार केले असेल पण जर त्यामध्ये मीठ नसेल तर संपूर्ण अन्नाची चव बिघडते. मिठाचा वापर तर अन्नामध्ये करतातच, वास्तू शास्त्रात देखील घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. 
 
मीठ कोणत्या डब्यात ठेवत आहात हे देखील बघावे. वास्तुनुसार मीठ कधीही स्टील किंवा लोखंड्याचा डब्यात ठेवू नये. मीठ नेहमीच काचेच्या भांड्यात ठेवावं. यामुळे आपल्या मिठात आद्रता देखील येतं नाही. यामुळे घरात सौख्य आणि समृद्धी येते.
 
मिठाशी निगडित काही वास्तू उपाय करून आपण ताण आणि आजारापासून मुक्त होऊ शकता, तसेच राहूच्या दुष्प्रभावापासून देखील मुक्ती मिळेल. 
 
जर आपल्याला काही मानसिक ताण असल्यास, दररोज पाण्यात चिमूटभर मीठ टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. या मुळे आपण तणाव मुक्त होऊ शकता. आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होईल.
 
जर का आपण किंवा एखाद्या व्यक्ती बऱ्याच दिवसापासून आजारी असल्यास, तर त्याचा झोपण्याचा ठिकाणी काचेच्या भांड्यात मीठ भरून ठेवावं. एक आठवड्यानंतर त्या मिठाला बदलून टाकावं. असे काही आठवडे करावं. हे केल्यानं त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि त्याचा तब्येतीत सुधारणा होईल.
 
रात्री झोपताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकून त्या पाण्याने आपले हात पाय धून झोपावं असे केल्यानं आपला ताण दूर होईल आणि आपल्याला रात्री झोप चांगली लागणार, तसेच राहू-केतूच्या दुष्प्रभावापासून आराम मिळेल.
 
मिठाच्या खड्यांना लाल कापड्यात बांधून घराच्या मुख्य दारावर लटकवून ठेवावं. या मुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. हे वाईट दृष्टीपासून देखील वाचवतं.