घरात पाल आणि झुरळ झाले आहेत, घरगुती उपाय करून बघा
आपल्या घरात आढळून येणारे नकोसे वाटणारे जीव म्हणजे पाल आणि झुरळ. पाल आणि झुरळांचं नाव ऐकूनच अंगाचा थरकाप होतो. यांना बघून अक्षरश: किळस येते. पाल भिंतीवर तर झुरळ सगळ्या घरात उच्छाद मांडतात. यांच्यामुळे शरीरात विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. बाजार पेठेतील सर्व उपाय करून देखील ते पुन्हा पुन्हा उद्भवतात. आपण काही घरगुती उपाय योजना करून यांचा नायनाट करू शकतो.
* काळी मिरी -
काळी मिरी तर प्रत्येक घरात आढळते. काळी मिरी खाद्य पदार्थांची चव तर वाढवतेच, त्याशिवाय पालीला घरातून दूर करण्यासाठी देखील मदत करते. काळ्या मिरीची पूड करून त्या मध्ये साबण आणि पाणी घालून मिसळा आणि पाल असलेल्या ठिकाणी त्याचा स्प्रे करा. पाल नाहीशी होते.
* कांद्याचा रस-
कांद्याचा रस तर बऱ्याच गोष्टींसाठी फायदेशीर असतो. पाल घरातून काढण्यासाठी कांद्याची पेस्ट करून त्याचे पाणी एका बाटलीत भरून ठेवावं आणि ज्या ठिकाणी पाली जास्त वावरतात तिथे स्प्रे करावं.
* अंड्याची टरफल -
अंड्याची टरफले पाल घालविण्यासाठी लटकवून ठेवावी. घरातून पाली नाहीश्या होतात.
* लसूण -
कांदा आणि लसणाच्या रसाचा एकत्ररीत्या स्प्रे केल्यानं पाली दूर होतात.
* कॉफी पूड किंवा पावडर -
घरातील पाल घालविण्यासाठी कॉफी पावडर आणि पाणी मिसळून घराच्या सर्व कानाकोपऱ्यांत लावून ठेवावं.
घरातील झुरळ काढण्यासाठीचे काही घरगुती उपाय-
झुरळ ज्याला बघूनच शिशारी येते. खाद्य पदार्थांवर बसल्यावर तर कॉलरा, अतिसार सारखे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांचा नायनाट करण्यासाठी काही घरगुती उपाय करून बघा.
* पुदिन्याचे तेल -
हे नैसर्गिक कीटकनाशक आहे. झुरळ घालविण्यासाठी पुदिन्याचे तेल आणि पाणी एकत्र करून स्प्रे बनवावा आणि घरात त्याने फवारणी करावी. नैसर्गिक असल्यामुळे हा हानिकारक अजिबात नाही.
* बेकिंग पावडर -
एका भांड्यात थोडं पाणी घ्या त्यामध्ये सम प्रमाणात साखर आणि बेकिंग पावडर मिसळा. आता हे पाणी झुरळ असलेल्या जागी शिंपडावे. साखरेच्या गोडपणा मुळे ते त्या पाण्याकडे येतील पण बेकिंग पावडरची वास त्या झुरळांना घराच्या बाहेर काढेल.
* लसूण, कांदा, आणि मिरपुडीचे मिश्रण -
लसूण, कांदा आणि मिरपूड हे झुरळ नष्ट करतं नैसर्गिक असल्यामुळे हे आपल्यासाठी हानिकारक नाही. याचा वासामुळेच घरातील झुरळ पळ काढतात.
* बोरिक पावडर -
बोरिक पावडरमुळे झुरळांचा नायनाट होतो पण घरात हे टाकताना खबरदारी घ्यावी.