नवरात्र साजरी करण्यामागील पौराणिक महत्त्व

navaratri 2020 date
Last Modified शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (13:22 IST)
नवरात्राच्या या नऊ दिवसात देवी आईच्या वेगवेगळ्या रूपाची आराधना करतात. वर्षात एकूण चार नवरात्र येतात. त्यामधील दोन अश्या या गुप्त नवरात्री असतात. साधारणपणे लोक चैत्र आणि शारदीय नवरात्र साजरे करतात. या नऊ दिवसात लोक देवी आईला आपल्या घरात वास्तव्यास आणतात. आपणास माहीत आहे का की नवरात्राचा सण का साजरा होतो, काय आहे त्यामागील पौराणिक कथा.
देवी आईच्या पूजेसाठी कोणत्याही वेळेची गरज नसते, परंतु नवरात्राचा काळ हा देवी आईच्या पूजेसाठी खास मानला जातो. नवरात्र साजरा करण्यामागे नैसर्गिक कारण असे मानले जाते की या काळात हवामान बदलतं. म्हणून जेव्हा आपण या नऊ दिवसाचे उपवास धरतो त्यावेळी आपल्या शरीराला हंगामानुसार समायोजित करण्यास वेळ मिळतो जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. आता जाणून घेऊ या पौराणिक महत्त्व.
नवरात्र साजरा करण्याशी निगडित दोन कथा आहेत, एक कथा रामनवमीशी निगडित आहे तर दुसरी कथा महिषासुराच्या वधाशी निगडित आहे.
आधी आपण

महिषासुराची कथा जाणून घेऊया.
महिषासुर नावाचा एक राक्षस होता. हा राक्षस ब्रहम देवांचा उपासक होता. आपल्या तपश्चर्याच्या बळावर त्याने ब्रह्माजी कडून वरदान मिळवलं की कोणीही मनुष्य, देव किंवा राक्षस त्याचा नाश करू शकणार नाही. ब्रहमांकडून मिळालेल्या या वरदानामुळे त्याने सर्वत्र उच्छाद मांडला होता. त्याने निर्दयतेने सर्व लोकात भीती पसरवून ठेवली होती. सर्व देव आणि ऋषी-मुनी त्याला त्रासले होते. तेव्हा परमपिता या विश्वाचे निर्मिते भगवान ब्रह्मा, देवांचे देव महादेव आणि श्री हरी विष्णू यांनी आपल्या शक्तीला एकत्र करून आई दुर्गेची निर्मिती केली महिषासुर आणि आई दुर्गे यांचा मध्ये संपूर्ण 9 दिवस युद्ध सुरू होते. नंतर आई दुर्गेने महिषासुराचा संहार करून सर्वांना त्याचा दहशतीतून मुक्त केले.
एका दुसऱ्या कथेनुसार प्रभू श्रीरामांना लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी रावणाशी लढाई जिंकण्यासाठी आई भगवतीचा आशीर्वाद मिळवायचा होता. त्यासाठी त्यांनी रामेश्वर येथे नऊ दिवसांपर्यंत देवी आईची पूजा केली. त्यानंतरच त्याने लंकेवर विजय मिळवली. म्हणून नवरात्राच्या नंतर दसरा सण वाईटावर चांगल्याची विजय म्हणून साजरे करतात.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

महाशिवरात्री : शिव मंत्र जपा, सुख-समृद्धी मिळवा

महाशिवरात्री : शिव मंत्र जपा, सुख-समृद्धी मिळवा
महाशिवरात्रीवर महादेवाची पूजा आराधना केली जाते. सुख, शांति, धन, समृद्धी, यश, प्रगती, ...

श्री गजानन विजय ग्रंथ बोधामृत

श्री गजानन विजय ग्रंथ बोधामृत
पहिल्या अध्यायी, सांगे गजानन अन्न पूर्णब्रह्म, ठेवा आठवण दुसऱ्या अध्यायी, सांगे ...

विजया एकादशी 2021 : मुहूर्त आणि विशेष गोष्टी जाणून घ्या

विजया एकादशी 2021 : मुहूर्त आणि विशेष गोष्टी जाणून घ्या
1. विजया एकादशी व्रत केल्याने अतिशय गंभीर आजरापासून देखील मुक्ती मिळते. 2. हे व्रत ...

दक्षिण काली म्हणजे काय आणि विशेष मंत्र कोणतं, जाणून घ्या

दक्षिण काली म्हणजे काय आणि विशेष मंत्र कोणतं, जाणून घ्या
माता कालिकेचे अनेक रूप आहेत ज्यापैकी प्रमुख आहे- 1. दक्षिणा काली, 2. शमशान काली, 3. ...

गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले

गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले
स्वामी भास्करासह आडगावात दत्त मंदिरात उतरले. भक्त मंडळींनी दर्शनास गर्दी केली. आडगावचे ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...