1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 4 जून 2018 (14:55 IST)

हिंदुस्तान युनिलिव्हर ब्रेकफास्ट बनवणार

Hindustan Unilever will make breakfast

हिंदुस्तान युनिलिव्हर पारंपरिक दक्षिण आशियायी ब्रेकफास्टचे पदार्थ बाजारात दाखल करत आहे. आधीच्या नूडन्स, सूप यांसारख्या पदार्थांमध्ये बदल करत कंपनीने खिचडी, पोंगल, उपमा अशा पौष्टीक पदार्थांचा समावेश करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या नव्या उत्पादनांमध्ये कंपनीने आयुष या आपल्या आयुर्वेदीक ब्रॅंडप्रमाणे ज्वारी आणि बाजरीच्या भरडीचा उपयोग केला आहे.

कंपनीचा मूळ हेतू पतंजलीसारख्या दलिया, कॉर्नफ्लेक्स, ओट्स यांसारख्या पदार्थांशी स्पर्धा करणे हा आहे. पदार्थ जास्त काळ टिकावेत यासाठी पदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांमुळे भारतात अशापद्धतीचे पदार्थ कमी प्रमाणात खरेदी केले जातात. आयुर्वेदातून आलेल्या पदार्थांच्या रेसिपींना पुढे आणणे आणि भारतीय लोकांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी कंपनीने अन्नपदार्थांच्या क्षेत्रात प्रवेश केला असून येत्या काळात त्याचे लोकशाहीकरण केले जाईल असे कंपनीच्या कार्यकारी संचालक गितू वर्मा यांनी सांगितले.