1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 4 जून 2018 (11:51 IST)

विदिशा महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर झाले व्हायरल काका

viral uncle
सोशल मीडियावर गोविंदा आणि मिथुन स्टाईल डान्स करुन सगळ्यांची मने जिंकणारे व्हायरल काका संजीव श्रीवास्तव यांची आता विदिशा महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजीव श्रीवास्तव यांचा गोविंदा स्टाईल डान्स 29 आणि 30 मे पासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हे व्हायरल काका मध्यप्रदेशातील एका महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक आहेत. संजीव श्रीवास्तव असे त्यांचे नाव आहे हे शुक्रवारीच समजले. माझे गोविंदा आणि मिथुन हे आयडॉल असून मी त्यांचा नाच पाहूनच नाच शिकलो असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. आता याच व्हायरल काकांना विदिशा महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर होण्याची संधी मिळाली आहे. माझा व्हिडिओ लोकांना इतका आवडेल असे वाटलेच नव्हते. 1982 पासून मी नाच करतो. गोविंदा हे माझे आयडॉल आहेत असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. तसेच माझा व्हिडिओ व्हायरल करणार्‍यांचे आणि तो आवडणार्‍यांचे मी आभार मानतो असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.