शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 2 जुलै 2018 (09:02 IST)

एका घरात ११ लोकांनी केली आत्महत्या

दिल्लीतील बुराडी परिसरात एकाच घरात तब्बल 11 मृतदेह सापडले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार घराच्या तपासात कागदावर हाताने काहीतरी लिहिलेल्या मजकुराच्या चिठ्ठ्या आढळल्या आहेत. यावरील मजकूर काळ्या जादूशी किंवा तंत्र मंत्राशी संबंधित असण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. बुराडी परिसरात ज्या 11 जणांचे मृतदेह सापडले त्यापैकी 10 मृतदेहांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. तसेच ते सगळेच फासावर लटकले होते. सामूहिक आत्महत्येचा प्रकार असेल तर आत्महत्येच्या वेळी घराचे दार उघडे कसे असेल असा संशय व्यक्त केला जात आहे. कारण शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबियांनी त्यांचा किराणा दुकान शनिवारी रात्री पावणे बारा वाजता बंद केले होते. या प्रकरणाने दिल्ली हादरली आहे. पोलीस सर्व अंगाने तपास करत असून कोणतीही शक्यता नाकारता येणार नाही असे पोलिसांनी सांगितले आहे.