शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

आज महाराष्ट्र दिवसासह आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि गुजरात दिन

एक मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो तसेच हा दिवस विश्वभरात लेबर डे अर्थात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. लेबर डे कर्मचारी आणि कामगारांसाठी साजरा केला जातो. भारतात एक मे रोजी बॉम्बे राज्याच्या दोन भागात विभाजित केले गेले होते ज्यातून एक महाराष्ट्र तर दुसरा भाग गुजरात या नावाने ओळखला गेला.
 
लेबर डे ची सुरवात 19 व्या शतकाच्या अखेरी झाली होती जेव्हा अमेरिकेत ट्रेड युनियन आणि कामगार आंदोलन सातत्याने वाढत होते. भरतासकट अनेक देशांमध्ये लेबर डे एक पब्लिक हॉलिडे असतं, तरी याला आता तेवढे महत्त्व नाही जेवढे एकेकाळी होते.
 
का साजरा केला जातो हा मे दिवस
 
4 मे 1886 ला अमेरिकन कामगार संघांनी स्ट्राइक केली होती. कामगार संघांनी आठ तासाहून अधिक काम न करण्याचा निर्णय घेतला होता. या स्ट्राइक दरम्यान शिकागो येथील हेमार्केट चौरस्त्यावर एक शांततापूर्ण रॅली काढण्यात आली होती. या स्ट्राइक दरम्यान शिकागोमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला आणि धावाधाव होताना परिस्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या ज्यात अनेक कामगारांनी प्राण गमावले.
 
हे प्रकरण हेमार्केट हत्याकांड म्हणूनही ओळखलं जातं. हेमार्केट मध्ये मरण पावलेल्या लोकांच्या स्मृतीत 1 मे कामगार दिन म्हणून साजरा केला जाईल ही घोषणा 1889 मध्ये करण्यात आली. तसेच या दिवशी सुट्टीची घोषणा केली गेली. हेमार्केट स्क्वायर, जिथे ही घटना घडली होती त्याला 1992 मध्ये शिकागो लँडमार्क नाव देण्यात आले.