रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 मे 2018 (09:01 IST)

डबेवाले पारंपरिक पोशाख प्रिन्स हॅरीला पाठवणार

मुंबईच्या डबेवाल्यांनी महाराष्ट्रातील लग्नांमध्ये पारंपरिक पद्धतीने जो पोशाख घातला जातो तसाच पोशाख मुंबईच्या डबेवाल्यांनी प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल या दोघांना पाठवण्याचे ठरवले आहे.  प्रिन्स हॅरी भारत दौऱ्यावर आले असताना त्यांनी आपल्याला लग्नाला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे डबेवाल्यांचा त्यांच्याशी भावनिक संबंध आहे. मेगन मार्केल आणि प्रिन्स हॅरी यांचा शाही विवाह सोहळा १९ मे रोजी पार पडणार आहे. 

सोबतच मुंबईच्या डबेवाल्यांनी १९ मे रोजी या शाही विवाह सोहळ्याचे सेलिब्रेशन भारतातही साजरे करण्याचे ठरवले आहे. मुंबईमधील टाटा मेमोरियल हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल आणि वाडिया हॉस्पिटल येथे मिठाई वाटून हे डबेवाले राजकुमाराच्या लग्नाच्या आनंदात सहभागी होणार आहेत. त्यामुळे अनोख्या पद्धतीने केले जाणारे हे सेलिब्रेशन नक्कीच खास आहे. १९ मे रोजी होणाऱ्या राजकुमाराच्या लग्नाच्या दिवशी आपले काम करुन डबेवाले हे विशेष काम करणार आहेत.