शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (15:51 IST)

मास्कचा हा जुगाड मुळीच कौतुकास्पद नाही, चिडले आनंद महिद्रा, शेअर केला फोटो

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा मजेशीर पोस्ट शेअर करत असतात पण यंदा त्यांनी पोस्ट केले आहे की मुंबईत कोरोनाचे केसेस का वाढत आहे. महिंद्रा यांचे अधिकतर पोस्ट जुगाडवर अवलंबून असतात. परंतू यंदा शेअर केलेली पोस्ट काळजीत टाकणारी आहे.
 
मुंबईत रुग्णसंख्या वाढत असून अनेकांप्रमाणे लोकल सुरु झाल्यामुळे हे घडत असल्याचे समजले जातं. परंतू महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोत लोकलमध्ये प्रवास करणार्‍या एका व्यक्तीने नाक-तोंडाऐजवी चक्क डोळ्यावर मास्क घातला आहे. 
 
आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोत एक व्यक्ती लोकलमध्ये झोपलेला दिसत असून कोरोना व्हायरसपासून बचावासाठी नाक-तोंडावर मास्क न लावता डोळ्यावर लावला आहे. महिंद्रांनी हा फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, जेव्हा तुम्ही मुंबईत कोरोना प्रकरण वाढत असल्याच्या कारणाचा शोध सुरू करता तेव्हा..(हा जुगाड कौतुकास पात्र नाही)
 
मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून जर नागरिकांना सुरक्षेचे उपाय केले नाही तर लॉकडाऊन लावण्याची वेळ येईल अशा इशारा देखील सरकारने दिला आहे.