1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 13 सप्टेंबर 2018 (00:07 IST)

अवघ्या 999 रुपयांत करा विमान प्रवास

Make an air travel
विमान प्रवास करणार्‍यांसाठी एक चांगली बातमी आहे. विमानसेवा देणारी कंपनी इंडिगो एअरलाइन्सने एक ऑफर आणली आहे. इंडिगोने 10 लाख विमान तिकिटांच्या विक्रीसाठी सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये तिकिटाची किंमत अवघ्या 999 रुपयांपासून सुरू होत आहे. देशांतर्गत विमान प्रवासाच्या तिकिटाची किंत 999 रुपयांपासून तर आंतरराष्ट्रीय विान प्रवासाच्या तिकिटाची किंत 3199 रुपयांपासून सुरू होत आहे. मर्यादित कालावधीसाठी ही ऑफर असेल, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. 999 रुपयांपासून तिकिटांची किंमत सुरू होत असून ग्राहक आमच्या नेटवर्कमध्ये कुठेही प्रवास करु शकतात, असं कंपनीचे मुख्य वाणिज्य अधिकारी विल्यम बोल्टर म्हणाले. इंडिगोच्या या सेलला तीन सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. 18 सप्टेंबर 2018 ते 30 मार्च 2019 पर्यंतच्या विमानप्रवासासाठी हा सेल आहे. या व्यतिरिक्त मोबिक्विक या अ‍ॅपद्वारे पेंट करणार्‍या ग्राहकांना 20 टक्के कॅशबॅकही मिळेल. कॅशबॅक जास्तीतजास्त 600 रुपयांपर्यंतच मिळेल.