सोमवार, 25 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (22:21 IST)

वाढदिवसानिमित्त राज ठाकरे कोणाला भेटणार नाहीत !

raj thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस आहे. मात्र या दरम्यान ते शारीरिक समस्यांशी झुंज देत आहे. शरीरात सापडलेल्या कोरोनाच्या मृत पेशींमुळे त्यांना ऑपरेशन करावे लागले. दरम्यान त्यांच्या वाढदिवसही आहे. मात्र, राज ठाकरे यांनी एक ऑडिओ क्लिप जारी करून पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना शिवतीर्थ  या त्यांच्या निवासस्थानी भेट न देण्याचे आवाहन केले आहे. 
 
राज ठाकरे व्हिडिओमध्ये म्हणाले, माझ्या महाराष्ट्राच्या सैनिका, मी पुण्यातील बैठकीत सर्वांना सांगिलते की मला ऑपरेशन करायचे आहे, मला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की माझ्या शरीरात कोविडच्या मृत पेशी आहेत. म्हणून माझी शस्त्रक्रिया रद्द झाली, आता कोविडमुळे मी 10 ते 15 दिवस होम क्वारंटाईन आहे, या सगळ्यात माझा वाढदिवस 14 जूनला येतोय, दरवर्षी तुम्ही सर्व मला प्रेमाने आणि उत्साहाने भेटायला या, मी सुद्धा तुम्हा सर्वांची वाट पाहत आहे, तुम्हा सर्वांना भेटून मला आनंद झाला, तरी या वर्षी 14 जून रोजी मी कोणाला भेटू शकणार नाही.