बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (22:21 IST)

54 रुपयात एक लिटर पेट्रोल!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 54वा वाढदिवस आहे.अशातच राज्यभरातील तमाम मनसैनिकांनी राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे राज यांच्या 54 वा वाढदिवसाच्या निमित्ताने 54 रुपये लिटरने पेट्रोल देण्याचा निर्णय औरंगाबादेतील मनसे पदाधिकार्‍यांनी घेतला आहे. 
 
ही सोय शहरातील क्रांती चौक पेट्रोल पंपावर सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान प्रत्येकी 1 लिटर पेट्रोल 54 रुपये लिटरने दिले जाणार असं खांबेकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे कमी किमतीत पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे.