गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: औरंगाबाद , शनिवार, 21 जुलै 2018 (08:50 IST)

मोदी सरकार परत सत्तेवर येणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय काय? पर्याय केव्हापासून शोधायला लागलात तुम्ही? आजवर कोणत्या पंतप्रधानाच्या वेळी तुम्हाला पर्याय होता? असा सवाल उपस्थित करत नसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढील वर्षी हे सरकार सत्तेत येणार नाही, असा ठाम विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त केला. राज गुरुवारपासून राठवाडा दौर्‍यावर आहेत.
 
मोदींसारखा एक पंतप्रधान हवा हे मीच पहिल्यांदा म्हटले होते. पण पंतप्रधान झाल्यावर त्यांची भूमिका बदलली. मग ते बदलल्यावर माझी भूमिका ही बदलली. आपल्या देशाला पंतप्रधान ठरवण्याचा पर्याय कुठा आहे? 2019ला हे सरकार परत येणार नाही त्याची रणनीती मी ठरवेन, असे राज म्हणाले.
 
जातीचा माणूस पाहून मतदान होणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून याबाबत प्रबोधन करण्याची वेळ आली आहे. ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी वाट लावली, असा आरोप त्यांनी केला.
 
'इव्हीएम'चा फायदा घेऊन भाजप निवडणुका लढवत आहे. समाजात चांगला बदल घडत नसेल तर सत्तेचा आणि युत्यांचा उपयोग काय?, असेही ते म्हणाले.