शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अविश्वास प्रस्ताव Live update : मोदी सरकारचा ऐतिहासिक दिवस

नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध आज संसदेत 11 वाजता अविश्वास ठरावावर चर्चा होईल. मोदी सरकारच्या विरोधात हा पहिला अविश्वास ठराव आहे. बुधवारी लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन यांनी तेलुगू देशम पार्टीच्या संसदांकडून देण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला स्वीकार केला होता. अविश्वास ठराव आणणारी तेलुगू देशम पार्टी (टीडीपी) आज शुक्रवारी लोकसभेत या चर्चेची सुरुवात करेल. या ठरावाचे अपडेट्स. 

राफेल कराराबाबत पुराव्याशिवाय सभागृहात आरोप करणं गैर, राहुल गांधींनी माफी मागावी, भाजपची मागणी 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकीदार नव्हे तर भागीदार आहेत : राहुल गांधी 
 
मोदी गुजरातेत  चीनच्या राष्ट्रपतींसोबत झोके घेत होते, त्यावेळी सीमेवर चीनचं सैन्य घुसलं होते : राहुल गांधी 
 
पंतप्रधानांनी एखाद्या जादूप्रमाणे राफेल कराराची किंमत वाढवली, 520 कोटींच विमान 1600 कोटींना खरेदी केलं, संरक्षणमंत्रीही खोटं बोलल्या : राहुल गांधी 
 
नोटाबंदी हा मोदींचा सर्वात मोठा विनोद, जीऐसटीने कोट्यावधींना लुबाडलं, बड्या उद्योगपतींसाठी मोदी काम करतात, शेतकरी, बेरोजगार, तरुणांची पदरी केवळ भूलथापा - राहुल गांधी 
 
तुम्ही रोजगारच्या नावाने भजी तळण्याचा सल्ला दिला, राहुल गांधीचं मोदी सरकारवर टीकास्त्र 
 
चीन 24 तासात 50 हजार युवकांना रोजगार देतो, मात्र तुम्ही (मोदी सरकार) 24 तासात अवघ्या 400 युवकांना रोजगार देता : राहुल गांधी 
मोदींबद्दल चुकले राहुलचे शब्द, 'बाहर जाते है'ऐवजी म्हणाले 'बार जाते है'
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा त्यांचं वर्चस्व सिद्ध करणार की सरकार विरूद्ध मोट बांधण्यात विरोधक यशस्वी होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
 
शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही होणार कारण तुमच्यात शक्ती नाही तुम्ही सूट नाही घालत - राहुल गांधी
 
पंतप्रधान हे राखणदार नव्हेत भागीदार - राहुल गांधी
 
आमच्या सैनिकांनी धैर्य दाखवलं आणि ते चानच्या समोर उभे ठाकले पण काही दिवसातच मोदी चीनला गेले आणि त्यांनी सांगितलं की कोणत्याही अजेंड्याशिवाय बोलणाटर - हाचीनचा अजेंडा होता राहुल

शिवसेनेचं माहित नाही पण आम्ही भाजपलाच मतदान करणार -नितीश कुमार
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा त्यांचं वर्चस्व सिद्ध करणार की सरकार विरूद्ध मोट बांधण्यात विरोधक यशस्वी होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
 
जे काम 70 वर्षात नाही झालं ते चार वर्षात झालं - राकेश सिंग
 
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी कसे रडले हे अख्ख्या देशानं पाहिलं - राकेश सिंग
 
कॉंग्रसचं सरकार म्हणजे घोटाळ्यांचं सरकार - राकेश सिंग

टीडीपी आणि कॉंग्रेसने मांडलेल्या मोदी सरकारच्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. परंतु, चर्चा सुरु होण्यापूर्वीच कॉंग्रेसला पहिला धक्का बसला आहे. बिजू जनता दलाच्या खासदारांनी सभात्याग केला आहे.
 
ओडीसावर अन्याय झाल्याचे म्हणत बिजू जनता दलाच्या खासदारांनी सभात्याग केला. यामुळे कॉंग्रेसचे पारडे थोडे हलके झाले आहे. तरीही विरोधी गटातील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलुगु देसम, सपा या प्रमुख पक्षांची एकी कायम असून ‘आप’नेही मोदी सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे
अविश्वास प्रस्ताव - व्हिप जारी करण्यावरून शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, शिवसेनेचा व्हिप अस्तित्त्वातच नव्हता, कुणीतरी खोडसाळपणे खोटा व्हिप जारी केला : चंद्रकांत खैरे, प्रतोद, शिवसेना 
 
या देशात पुतळ्यांसाठी जास्त पैसे मिळतात, मात्र विकास कामांना पैसे मिळत नाहीत : जयदेव गल्ला, खासदार टीडीपी, आंध्रप्रदेश 
 
महाराष्ट्रात छ‍त्रपती शिवराय आणि गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांना जेवढा पैसा मिळाला, त्यापेक्षा कमी पैसा आंध्र प्रदेशला विकासासाठी मिळाला : जयदेव गल्ला, खासदार टीडीपी, आंध्रप्रदेश 
 
आंध्र प्रदेशाला कर्जाचा डोंगर दिला, उत्पन्नाचे मार्ग बंद केले, केंद्र सरकारने आंध्राच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसली  : जयदेव गल्ला 

अविश्वास प्रस्तावावर संध्याकाळी 6 वा. मतदान, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची माहिती
मोदी सरकारने आंध्र प्रदेशवर अन्याय केला, मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, भेदाची भावना ठेवली, त्यामुळे आंध्राच्या 5 कोटी जनतेच्यावतीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव : जयदेव गल्ला, खासदार टीडीपी, आंध्रप्रदेश 
 
शिवसेना मतदान करणार नाही, तटस्थ राहणार, सेनेचे खासदार सभागृहता जाणार नाहीत : संजय राऊत शिवसेना सरकारसोबत राहणार, पण लोकसभेत मतदान नाही करणार 
 
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेसाठी कमी वेळ मिळाल्याने काँग्रेसची नाराजी.
 
आपल्या भाषणाने भूकंप येईल, असे राहुल गांधी म्हटले होते. त्यानुसार भूकंप नक्कीच येईल, पण तो काँग्रेस पक्षात येईल आणि एनडीएला अपेक्षेपेक्षा अधिक पाठिंबा मिळेल. - अनंत कुमार, भाजपा नेते  
 
अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचे संसदेत आगमन
 
अविश्वास प्रस्तावादरम्यान शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत मांडणार पक्षाची भूमिका
 
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राजनाथ सिंह, राकेश सिंह, वीरेंद्र सिंह मस्त आणि अर्जुन राम मेघवाल मांडणार सरकारची बाजू
 
अविश्वास प्रस्तावादरम्यान खासदारांनी लोकसभेत विधायक, व्यापक आणि व्यत्यय-मुक्त चर्चा करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.