गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

अंदमानात मान्सून दाखल

मान्सून अंदमानात दाखल झाला असून पुढील 48 तासांत बंगालच्या उपसागरातील अन्य भागातही मान्सून धडकणार आहे.  मान्सून लवकरच केरळमध्ये पोहोचणार असल्याची माहितीदेखील हवामान विभागानं दिली आहे. 
 
दरम्यान, 27 मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 मे रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25 ते 28 मे दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
 
दुसरीकडे राजस्थानाचा काही भाग, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम मध्य प्रदेश या परिसरातील काही भाग तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भातील एक ते दोन ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे.