गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (18:22 IST)

'माझे वडील पोलिसात आहेत...' मुलाने रडत शिक्षिकेला दिली धमकी, व्हिडिओ व्हायरल

इंटरनेटवर मुलांच्या निरागसतेने भरलेले अनेक व्हिडिओ आहेत.जे मुलांचा निरागसपणा दाखवतात आणि लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडीओ साध्यासोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे लोकांचे लक्ष वेधत असून मुलाच्या निरागसतेवर लोक प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीच आहे हे सांगता येत नाही.
 
ही व्हिडीओ क्लिप 27 सेकंदाची आहे, ज्यामध्ये मुलगा रडत आहे आणि सांगत आहात की माझे वडील पोलिसात आहेत. मॅडम बोलल्या तर काय करायचं. मग तो म्हणतो गोळी मारणार. मॅडम म्हणते कोणाला ?या वर मुलगा म्हणतो तुम्हाला. यानंतर मॅडम  विचारतात, तुला अभ्यास करायला आवडत नाही का? बाळाची गोंडस उत्तरे तुम्हाला आश्चर्यचकित करतील तसेच तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणतील.