1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (23:44 IST)

टाइम मॅगझिनच्या 100 'सर्वात प्रभावशाली लोकांच्या' यादीत मोदी-ममता आणि अदार पूनावाला

पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या 2021 च्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थान मिळाले आहे.
 
पीएम मोदी व्यतिरिक्त, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांचाही टाईमने सर्वाधिक प्रभावशाली लोकांच्या यादीत समावेश केला आहे.
 
टाइमने बुधवारी '2021 च्या 100 सर्वात प्रभावशाली लोकांची' वार्षिक यादी जाहीर केली. नेत्यांच्या या जागतिक यादीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि मेगन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे.