1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (09:10 IST)

भाजपच्या दहीहंडीत अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की

neha pendse
भाजपने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. 
 
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे भाजपच्या नेत्या, जिल्हा परिषद सदस्य श्वेता महाले यांनी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री नेहा पेंडसे हिला बोलावण्यात आले होते. नेहाला पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. परंतु नेहा स्टेजवर येत असताना तिला धक्काबुक्की करण्यात आली. ढिसाळ नियोजनामुळे नेहा प्रचंड संतापली आणि कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेली. यावेळी स्टेजवर नेहाने आयोजकांजवळ कठोर शब्दात आपला संताप व्यक्त केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.