शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (16:46 IST)

आता स्काईपवर करा कॉल रेकॉर्डिंग

स्काईप हे व्हिडियो कॉलिंगसाठी वापरले जाणारे सर्वात जुने अॅप्लिकेशन आहे. आता या अॅप्लिकेशनवर ग्राहकांना आता एक नवीन सुविधा उपलब्ध होणार आहे. कंपनीने नुकतीच याबाबतची घोषणा केली असून नेमक्या कोणत्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल हे सांगितले आहे. स्काईपवर आता कॉल रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.
 
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या या कंपनीने आपल्या अपडेटेड व्हर्जनसाठी ही सुविधा दिली आहे. हे नवीन व्हर्जन डेस्कटॉप आणि मोबाईल दोन्हीसाठी उपलब्ध असेल असे सांगण्यात आले आहे. सध्या विंडोज १० ऑपरेटींग सिस्टीमवर ही सुविधा उपलब्ध नसेल. मात्र काही आठवड्यातच ती उपलब्ध होईल असे कंपनीचे म्हणणे आहे. स्काईपने व्हिडियो कॉलिंगची सुविधा १० वर्षापूर्वी सुरु केली असून कालांतराने त्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे.