परिस्थितीचा भानच नाही! पुराच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी धडपड, व्हिडीओ व्हायरल
दक्षिण भारतात सध्या मिचान्ग चक्रीवादळाने धुमाकूळ केलं आहे. जोरदार वादळी पावसाने पूरसदृश्य स्थिती निर्माण केली असून सामान्य जीवन अस्तव्यस्त झाले आहे. अनेको मृत्युमुखी झाले आहे. पुराच्या पाण्यातून अनेक आयुष्य बचावले आहे.
या नैसर्गिक आपत्तीचे छायाचित्र आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मधून काही गमतीशीर व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहे.
दक्षिण भारतात सध्या लोक आपला जीव कसा वाचवता येईल या कडे लक्ष देत असताना पुराच्या पाण्यातून मासे पकडण्यासाठी एका व्यक्तीचा धडपड करण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.