मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

अभिनेत्रीचे कृत्य, पॉवर बँक भिंतीवर फेकली, झाला स्फोट

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासाच्यावेळी अभिनेत्री मालविका तिवारी यांची बॅग सुरक्षा कर्मचारी तपासत होते. त्यावेळी त्यांच्या बॅगेत पॉवर बँक सापडली. कर्मचार्‍यांनी ती बाहेर काढून दाखवण्यास सांगितले. पण मालविका यांनी रागाच्या भरात ती पॉवर बँक भिंतीवर फेकली. भिंतीवर आदळून त्या पॉवर बँकेचा स्फोट झाला, त्यातून धूर आणि ठिणग्या उडाल्या. 
 
सुरुवातीला महिलेने हँड ग्रेनेड फेकल्याचा सुरक्षा कर्मचार्‍यांना संशय होता. पण तपासाअंती ती पॉवर बँकच असल्याचे निष्पन्न झाले. स्फोटानंतर तत्काळ महिलेला अटक करण्यात आली. पण काही वेळानंतर महिलेची जामीनावर सुटका झाली.