गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

जेलमध्ये सामान्य लोकांना जेवू घालतील कैदी, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

कैदींनी तयार केलेले पदार्थ आता सामान्य लोकं देखील खाऊ शकतील. 100 रुपये थाळीत पोटभर जेवण मिळेल. परंतू या साठी आपल्याला कारागृहात जावं लागेल. शिमला येथील कैथू जेल येथे ही योजना सुरू केली जात आहे.
 
आता येथे ‘काराथाळी’ योजना सुरू होत आहे. व्यवस्थापनाद्वारे आठवड्याचा मेन्यू देखील तयार केला गेला आहे. योजनेच्या सुरुवातीला आठवड्यातून केवळ दोनदा सामान्य लोकांना दोन वेळा जेवण मिळेल. काराथाळीमध्ये तांदूळ, डाळ, भाजी, पोळी या व्यतिरिक्त सलाद देखील मिळेल.
 
व्यवस्थापनाकडून या योजनेची सुरुवात करण्यामागील उद्देश्य लोकांना हे दाखवणे आहे की कारागृहात कैदींना कशा प्रकाराचे जेवण देण्यात येतं. या व्यतिरिक्त जेल प्रशासन कैदींची आजीविका वाढवण्यासाठी ही योजना सुरू करत आहे. 
 
या योजना अंतर्गत सुरुवातीला जनता आठवड्यातून दोन दिवस मंगळवार आणि शनिवार कारागृहात जेवू शकेल. येथे जेवण करण्याचे इच्छुक सकाळी 10 ते 5 दरम्यान येऊ शकतात. वर्तमानात कैथू जेलमध्ये 128 कैदी आहेत ज्यातून 7 महिला आहेत.

फोटो: सांकेतिक