सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 17 मार्च 2018 (09:18 IST)

नोटबंदी आणि जीएसटीचा बळी, लिहिली फेसबुक पोस्ट

नोटबंदी आणि जीएसटीचा बळी, लिहिली फेसबुक पोस्ट, शिवसैनिकांची कळकळीची आणि शेवटची विनंती

सातारा येथील एका तरुण व्यापाऱ्याने नोटबंदी आणि जीएसटीचा वैतागून आत्महत्या केली आहे. याबाबत त्याने फेसबुक पोस्ट टाकून व्यापाऱ्याने आत्महत्या केली. कराड शहराजवळ रेल्वेखाली उडी घेऊन राहुल फाळके यांनी आत्महत्या केली आहे. तर राहुल फाळके हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते.

भविष्यात कुटुंबीयांकडे आणि शिवसेनेकडे लक्ष देण्याचंही आवाहन राहुल फाळके यांनी फेसबुक पोस्टमधून केलं असून उघड झालेली ही पहिलीच नोटबंदी आणि जीएसटीचा  आत्महत्या  आहे.
राहुल फाळके यांचं कराडमधील अहुजा चौकात सराफा दुकान आहे. राहुल फाळकेंची फेसबुक पोस्ट

सर्वांना माझा शेवटचा नमस्कार  
जेव्हापासून मोदींनी नोट बंदी केली .... तेव्हा पासून सोने चांदी व्ययवसायाला उतरती कळा लागली आणि हे कमी कि काय म्हणून GST लागू केला.
त्यामुळे संपूर्ण व्यवसाय अडचणीत आला.आधीच आमचा व्यावसाय उधारी शिवाय चालत नाही. त्यामुळे उधारीत पैसे अडकले
खूप लोकांवर विश्वास ठेवून त्यांना मदत केली
खूप जणांना अडचणीतून बाहेर आणले
पण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझा फक्त विश्वासघात केला
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानुसार 1 शिवसैनिक म्हणून समाजामध्ये राहताना नेहमी ताठ मानेने जगलो पण आज काही चूक नसताना मन खाली घालुन मी जगू शकत नाही
मला कोणाला हि फसवायच नव्हतं
माझा तसा स्वभाव हि नाही
पण प्रत्येकाने मला फसवले आणि त्यामुळे मला सर्वाना फसवून जायला लागत आहे.
आणि माझ्या मृत्यूस कोणालाही जबादार धरू नये
आणि कोणावर हि कोणतीही कारवाई करू नये
माझ जीवन उध्वस्त झालंय
मला कोणाचं आयुष्य उध्वस्त नाही करायचं
Alwaida ...... 
घरातील सर्वांसह .... माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला खूप miss करेन
तुमचा
राहुल
आणि सर्वात महत्वाचं ...... यापुढे कृपा करून शिवसेनेला निवडून द्या 
कारण फक्त थापा मारणारे आणि भाषणबाजी करणारे खूप नेते आहेत पण
श्री उद्धव ठाकरे यांना मन आहे
ते उत्कृष्ट वक्ता नसतील पण जनतेच्या वेदना त्यांना नक्की समजतात आणि जेव्हा महाराषष्ट्रावर भगवा फडकेल तीच मला खरी श्रद्धांजली असेल
आणि माझी फक्त 1 च विनंती आहे माझ्या कुटुंबाची जबाबदारी शिवसेना आणि शिवसैनिकांनी घ्यावी
हि तुमच्या एका शिवसैनिकांची कळकळीची आणि शेवटची विनंती