बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (11:02 IST)

सानिया मिर्झाने दिला मुलाला जन्म, सोशल मीडियावर धूम ...

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घरी नवीन पाहुणा आला आहे. सानियाने हैदराबादच्या एका दवाखान्यात मुलाला जन्म दिला आहे. तिचा नवरा शोएब मलिकने ट्विटरवर वडील झाल्याची बातमी शेयर केली. बॉलीवूडच्या बर्‍याच स्टार्सने सानियाला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. ट्विटरवर #BabyMirzaMalik ट्रेंड करायला लागला आहे.  
 
शोएबने शुभेच्छा देणार्‍या लोकांचे आभार मानले आहे. त्याने लिहिले आहे की मी फारच उत्साहित आहे. बेटा झाला आहे. माय गर्ल (सानिया) स्वस्थ आहे आणि नेहमीप्रमाणे स्ट्रॉंग आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी शुक्रिया. #BabyMirzaMalik"
 
सानिया मिर्झा आई झाल्याची बातमी फारच वेगळ्या प्रकारे तिची बहीण अनम मिर्झाने सोशल मीडियावर शेयर केली. तिने सांगितले की ती खाला बनली आहे. भाच्याचा जन्म 30 ऑक्टोबर, 2018 रोजी झाला आहे.  
 
फिल्म निर्देशक फराह खान टेनिस स्टार सानियाची जवळची मैत्रीण आहे. तिनी देखील दोन पोस्ट करून सानियाला आई बनण्याची बधाई दिली.