बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 12 मे 2018 (11:46 IST)

प्रेगनेंसीनंतर सर्वात आधी हे काम करेल सानिया मिर्जा

काही आठवडे अगोदरच भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्जाने तिचे गर्भवती होण्याची माहिती दिली होती. ही माहिती स्वत: सानियाने सोशल मीडियावर आपल्या ट्विटर एकाउंटद्वारे एका फोटोच्या माध्यमाने दिली होती.
 
सानिया मिर्जाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी निकाह केला होता आणि दोघांनी आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्राम एकाउंटने आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्ससाठी नवीन पाहुण्याच्या आगमनाची गोड बातमी दिली होती. सानियाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की ती आपल्या मुलाचे नाव 'मिर्जा मलिक'च्या रूपात उपनाव आणि फक्त मलिकच्या रूपात ठेवणार आहे.
 
गर्भावस्थेदरम्यान सानियाला ज्या प्रश्नांचे उत्तर शोधावे लागणार आहे ते असे की वर्ष 2020मध्ये तोक्योत सुरू होणार्‍या ऑलिंपिकमध्ये सहभागी घेईल की नाही.
 
सानियाने आपल्या मुलाखतीत सांगितले की ती दुसर्‍या महिलांसाठी एक आर्दश बनण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या गर्भावस्थामुळे करिअर किंवा स्वप्नांशी समझोता करून घेतात. महत्त्वाचे आहे की सानिया मिर्जा गुडघ्याच्या जखमेमुळे 6 महिन्यांपासून टेनिसशी दूर आहे.
 
पण आता सानियाच्या गुडघ्याचे दुखणे बरे होऊ लागले आहे. तोक्यो ऑलिंपिकमध्ये भाग घेण्याच्या प्रश्नावर तिने सांगितले की सध्यातर हे फारच अवघड वाटत आहे कारण ऑक्टोबरपर्यंत ती आई बनणार आहे. पण तिचा प्रयत्न राहणार आहे की लवकरात लवकर तिचे चाहते तिला टेनिस कोर्टावर परत खेळताना बघू शकतील.