विम्बल्डनच्या हिरवळीचे गेली 10 वर्षे रक्षण करतोय ससाणा
यंदाही दरवर्षीप्राणे विम्बल्डन टेनिस स्पर्धा उत्साहात आणि नेहमीच्या शानने पार पडल्या. ग्रास कोर्टवर खेळली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम स्पर्धा. त्यामुळे येथील हिरवळ अतिशय कसोशीने वर्षभर जोपासावी लागते. विशेष म्हणजे या हिरवळीचे गेली दहा वर्षे संरक्षण करतोय एक ससाणा. रुफस नावाच्या ससाण्याची खास त्यासाठी नेमणूक केली गेली आहे. या हिरवळीचे कबुतरे फार नुकसान करतात आणि या कबुतरांना पळवून लावायची जबाबदारी या ससाण्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार विम्बल्डनचे आयोजन करणार्या ऑल इंग्लंड क्लबने या ससाण्याची नेमणूक केली आहे. हा ससाणा अमेरिकन हॅरीस या जातीचा आहे. तो कुठे आहे याचा ठावठिकाणा समजण्यासाठी त्याच्या शरीरात रेडिओ ट्रान्समीटर बसविला गेला आहे. याचे 10 हजार फॉलोअर आहेत. 16 आठवड्यांचा म्हणजे 4 महिन्यांचा असल्यापासून तो विम्बल्डनध्ये सेवा देत आहे.