बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 9 जुलै 2018 (15:30 IST)

ताजमहालमध्ये नमाज पढण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

जगप्रसिद्ध ताजमहालमध्ये नमाज पढण्याची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.  यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने स्पष्ट केले की ही वास्तू सात आश्चर्यापैकी एक आहे. त्यामुळे येथे नमाज पढता येणार नाही. 
 
ताजमहालमध्ये नमाज पढण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका येथील आग्रातील स्थानिक नागिरकांनी केली होती. याचिकेत स्थानिक लोकांसोबत बाहेरच्या लोकांना देखील नमाज पढण्यास द्यावे असे म्हटले होते. ताजमहालमध्ये एक मस्जिद असून येथे प्रत्येक शुक्रवारी नमाज होते. यावरून अनेक वेळा वाद निर्माण झाला आहे.