चाँद तारा असलेला हिरवा झेंडा ताण वाढवतो, शिया वक्फ बोर्डाची झेंडे हटवण्याची मागणी
सुप्रीम कोर्टाने चाँद तारा असलेले झेंडे फडकवण्यावर बंदी घालण्यासंबंधी याचिकेवर केंद्र सरकाराला आपला पक्ष मांडण्यासाठी सांगितले आहे.
‘चाँद तारा’ हे चिन्ह असलेल्या हिरव्या झेंड्यांना आक्षेप घेणारी याचिका शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सईद वासीम रिझवी यांनी दाखल केली आहे. ती याचिका न्यायमूर्ती ए. के. सिक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे सुनावणीला आली होती. त्यावेळी रिझवी यांच्या मागणीवर केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याच्या दृष्टीने त्या याचिकेची एक प्रत ऍडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना खंडपीठाने दिली.
‘चाँद तारा’ चिन्ह असलेले हिरवे झेंडे ‘इस्लामविरोधी’ असल्याचे सांगत त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी दाखल केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
‘चाँद तारा’ चिन्ह असलेले हिरवे झेंडे अनेक धार्मिक स्थळांवर फडकताना दिसतात आणि हे इस्लामविरोधी असून याने ताण वाढतं, दोन समुदायात दुरी वाढते म्हणून यावर बंदी घातली पाहिजे.
स्वातंत्र्यपूर्व काळात १९०६ सालात नवाझ वकार उल मलिक आणि मोहम्मद अली जीना यांनी ‘मुस्लिम लीग’ या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. ‘चाँद तारा’ हे चिन्ह असलेला हिरवा झेंडा त्या पक्षाचा आहे. मुसलमान लोक त्याला ‘इस्लामिक’ मानत आले असले तरी इस्लामशी त्याचा दुरान्वयानेही संबंध नाही, असे शिया वक्फ बोर्डाचे म्हणणे आहे.