1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified मंगळवार, 7 जून 2022 (19:56 IST)

विद्यार्थी आणि शिक्षिकेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

शिक्षक आणि विद्यार्थींचं नातं खूप महत्त्वाचं आणि विशेष आहे. एका शिक्षकाच्या हाताखाली विद्यार्थी तयार होतात. घडतात. आणि एका चांगल्या शिक्षकाच्या संस्काराखाली मोठं यश संपादन करतात. पण सध्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याने हा व्हिडीओ पहिला त्याने संताप केला आहे. 

सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका शाळेचा आहे. या व्हिडिओमध्ये एक शिक्षिका वर्गात झोपलेली आहे आणि वर्गात मुलं बसलेली आहे. एवढेच नव्हे तर या शिक्षिकेने एका मुलीला चक्क कामाला लावले आहे , ती मुलगी या शिक्षिकेला वारं घालत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहे. लोक म्हणत आहे की, मुलांना चांगले संस्कार देणारे शिक्षकचं असे वागू लागले  तर मुलांनी कोणाकडे पाहायचे? मुलांना चांगले संस्कार कसे काय लागणार ?
 
सोशल मीडियावर baatbiharki या अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बिहारमधील एका सरकारी शाळेचा असून वर्गात मुले जमिनीवर बसलेले आहे. जवळ एक खुर्ची ठेवलेली असून त्यावर एक शिक्षिका बसून शांतपणे झोपलेली दिसत आहे. आणि खुर्चीच्या शेजारी एक मुलगी उभारून त्या शिक्षिकेला वारं घालत आहे. या वर मुलांचं भविष्य अंधारात ठेवून शिक्षिका आरामात झोपा काढत आहे, जणूं तिला कसली काळजीच नाही. 

या वर स्पष्टीकरण देत महिला शिक्षिका म्हणत आहे की, मी असं काहीच केलेलं नाही, मला कोणीतरी मुद्दाम फसवून माझी बदनामी करत आहे.