शनिवार, 6 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (12:17 IST)

बायकोला बाईकवर बसवून स्टंट केले

stunts by putting his wife on a bike Stunts On Bike With Wife News in Marathi
सध्या सोशल मीडिया वर रील्स बनवणे हे सामान्य झाले आहे. लोकांना इंस्टाग्रामवर रील्स  बनवण्याचा छन्द लागला आहे. लहान असो किंवा मोठे तरुण असो किंवा वृद्ध असो इंस्टावर रिल्स टाकतात. त्यात कोणी डान्स करतात तर कोणी काही अफलातूनच करतात. सध्या इंस्टावर बाईकवर स्टंट करण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मध्ये बाईकवर एक तरुण आपल्या बायकोला मागे बसवून आहे आणि खतरनाक स्टंट करत आहे. 
 
व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये रॉयल एनफिल्ड बाईक वर एक जोडपं बसलं आहे. त्या तरुणाने काळ्या रंगाची शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे त्याची बायको मागे बसली आहे. बाईक वेगाने धावत आहे. तो माणूस चालत्या बाईकच्या सीटवर बसतो आणि हळू-हळू बाइकवरील हॅण्डल सोडून सीटवर उभा राहतो. त्याची बायको काहीही हालचाल न करता मागेच बसून राहते. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by memes comedy (@ghantaa)

हा व्हिडीओ 16 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 24 लाखांपेक्षा अधिक व्युज आणि 95 हजार पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहे. 

Edited By- Priya Dixit