बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (10:29 IST)

बॉडी बनवण्यासाठी केले विचित्र प्रयोग, गंभीर दुष्परिणाम भोगावे लागले

मॉस्को- तरुणांमध्ये एक सामान्य वेड दिसून येतं ते म्हणजे बॉडी ब्लिडिंगचं. पिळदार शरीर, सिक्स पॅक्ज अॅब्ज, डौलदार बायसेप्स यासाठी तरुणांचे प्रयत्न सुरु असतात. अनेकदा व्यायामसह काही लोकं यासाठी औषधांच्या बळी पडतात. अनेक लोकांना याचे इतकं वेड लागतं की वेगवेगळे प्रयोग करु लागतात. अशाच एक प्रयोग रशियातील एका बॉडी बिल्डरला चांगलंच महागात पडलं आहे. 
 
रशियातील 24 वर्षांचा बॉडीबिल्डर किरील टेरेशीनला आपली बॉडी बनवायची होती. यासाठी त्याने विचित्र प्रयोग करत चक्क आपल्या हातांवर पेट्रोलियम जेलीच इंजेक्शन घेतलं. किरीलनं ने वयाच्या 20 वर्षापासून इंजेक्शन घेणं सुरू केलं. याच्या दुषपरिणामाबद्दल विचार न करता त्याने इंजेक्शन घेतले. त्याला संपूर्ण शरीरावर हे इंजेक्शन घ्यावेसे वाटत होते पण सर्वात आधी माझ्या बाइसेप्सवर याचा काय परिणाम होतो तो पाहिला.
 
याने त्याचे बायसेप्स 24 इंचाचे झाले. पण त्याचा फायदा झाला नाही कारण स्पर्धेत तो अवघ्या तीन मिनिटांतच पराभूत झाला. उलट त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसू लागले. त्याच्या हाताला वेदना होऊ लागल्या, तापही येऊ लागला. नंतर किरीलला यासाठी सर्जरी करावी लागली. एक सर्जरीत त्याच्या हातातून सिंथोल ऑईल आणि डेड मसल्स टिश्यूज काढण्यात आले आणि आता आणखी एक सर्जरी करायची आहे. 
 
मीडिया सूत्रांप्रमाणे किरीलचे सर्जन म्हणाले की त्याची सर्जरी झाली नसती तर त्याचा जीव देखील गेला असता. हा प्रयोग खूप घातक आहे. म्हणून असे प्रयोग करणे टाळावे.