शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (09:28 IST)

गुगलकडून शिक्षकांसाठी अनोखे गिफ्ट, एक खास 'डुडल'

teachers day
शिक्षकांचा आदर राखत गुगलने एक खास डुडल तयार केले आहे. गुगलचे हे खास अॅनिमेटेड डुडल हे जगभरातल्या शिक्षकांसाठी अनोखे गिफ्टच ठरले आहे. गुगलने अत्यंत खास पद्धतीने हे डुडल तयार केले आहे. GOOGLE या अक्षरांमध्ये G हा एक ग्लोब दाखवण्यात आला आहे. हा ग्लोब फिरतो आणि थांबतो. त्याला एक चष्माही लावण्यात आला आहे जो एखाद्या शिक्षकाप्रमाणेच भासतो. तसेच हा ग्लोब जेव्हा फिरून थांबतो तेव्हा त्यातून गणित, विज्ञान, अंतराळ, संगीत, खेळ या विषयांशी संबंधित चिन्हे बाहेर येतात. अत्यंत लोभस असे डुडल आपल्याला पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह होतो.