शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. ट्रेडिंग
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2024 (17:38 IST)

शाळेत उशिरा येण्यावरून शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल!

Agra news
social media
उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे शाळेत उशिरा आल्यामुळे शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मध्ये त्या एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. शाळेतील स्टाफ त्यांना रोखण्यासाठी बचाव करत आहे.  
 
सदर घटना आग्राच्या एका शाळेतील आहे. शाळेत उशिरा येण्यावरून मुख्याध्यापकाने एका शिक्षिकेला दारातच अडवलं आणि उशिरा येण्याचं कारण विचारलं यावरून दोघांमध्ये वादावादी झाली आणि नंतर मारहाण सुरु झाली. 
 
या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून व्हिडीओ मध्ये शाळेच्या एका वर्गात दोघी मारहाण करत आहे . भांडण झाले तेव्हा एकही विद्यार्थी शाळेत नव्हता. तर एक पुरुष शिक्षक त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर शाळा प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे. दोघींनी एकमेकींच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत आहे. या व्हिडिओवर नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. 

Edited By- Priya Dixit