चुकीचा हेअरकट केल्यामुळे सलूनला 2 कोटींची भरपाई द्यावी लागली

hair cut
Last Modified शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (15:01 IST)
अनेकदा सलून किंवा पॉर्लरमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे हेअरकट केला जात नाही. अशावेळी मनस्ताप झेलावा लागतो पण अलीकडे देशात एक घटना अशी घडली आहे, जिथं सलूनला चुकीच्या पद्धतीनं केस कापण्यासाठी तब्बल 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोग (NCDRC) यांच्याकडून चुकीच्या पद्धतीनं केस कापणाऱ्या सलूनला 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यास बजावलं आहे. वास्तविक, ही भरपाई चुकीच्या पद्धतीने महिलेचे केस कापून आणि केसांवर चुकीचे उपचार देऊन केसांना कायमचे नुकसान केल्याच्या बदल्यात देण्यास सांगितले आहे.
रिपोर्टनुसार, हा सलून दिल्लीतील एका हॉटेलमध्ये स्थित आहे. एप्रिल 2018 मध्ये आशना रॉय त्यांच्या केसांच्या उपचारासाठी गेली होती. त्या 'हेअर प्रॉडक्ट्स'ची मॉडेल होत्या आणि त्यांनी अनेक मोठ्या 'हेअर-केअर ब्रँड' साठी मॉडेलिंग केली होती. परंतु सलूनने त्याच्या सूचनांच्या विपरीत केस कापल्यामुळे त्यांना त्यांचे काम गमवावे लागले आणि आर्थिक नुकसानही सहन करावा लागला, ज्यामुळे तिची जीवनशैलीच बदलली नाही तर त्यांचे टॉप मॉडेल बनण्याचे स्वप्नही भंगले.
आशना रॉय यांनी म्हटले की मी सलूनला स्पष्टपणे सांगितले होते की समोरून लांब फ्लिक्स आणि मागून चार इंच कापा. पण हेयरड्रेसरने स्वेच्छेने फक्त चार इंच केस सोडून तिचे लांब केस कापले. मॉडेलनं ज्यावेळी सदर प्रकरणी तक्रार केली तेव्हा तिनं फ्री हेअर ट्रीटमेंटचा उल्लेख केला.

आशनाचा दावा आहे की या काळात केमिकलमुळे तिच्या केसांना कायमचे नुकसान झाले आहे. हे संपूर्ण प्रकरण आशनानं राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोग (NCDRC) यांच्याकडे नेलं आणि तीन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. पण, सध्या तरी तिला 2 कोटी रुपयांचीच नुकसान भरपाई देण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत. येत्या दोन महिन्यात ही रक्कम आशनापर्यंत पोहोचणं अपेक्षित असेल.
photo: symbolic


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या ...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान
मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश ...

धक्कादायक ! चार राज्यांत परदेशातून आलेले 30 प्रवासी ...

धक्कादायक ! चार राज्यांत परदेशातून आलेले 30 प्रवासी कोविड-19 पॉझिटिव्ह
जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत ...

राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत – उद्योगमंत्री सुभाष ...

राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत – उद्योगमंत्री सुभाष देसाई
देशातील उद्योजकांची पहिली पसंती ही महाराष्ट्र राज्याला आहे. राज्यात असलेल्या उद्योगस्नेही ...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी
महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली ...

आश्चर्यकारक ; फुफ्फुसात अडकलेली शिट्टी काढून डॉक्टरांनी ...

आश्चर्यकारक ; फुफ्फुसात अडकलेली शिट्टी काढून डॉक्टरांनी वाचवला 12 वर्षांच्या चिमुरड्याचा जीव
पश्चिम बंगालमधील एसएसकेएम रुग्णालयात 12 वर्षीय रेहानच्या फुफ्फुसात अडकलेली सीटी काढून ...