बुधवार, 2 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. ट्रेडिंग
Written By
Last Updated : मंगळवार, 1 एप्रिल 2025 (18:14 IST)

काका आहेत का, बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल

आपण पोपटांना बोलताना ऐकलेच आहे पण कधी पण बोलणाऱ्या कावळ्याला बघितले आहे का.पण महाराष्ट्रातील पालघर येथे एक कावळा आहे जो माणसांप्रमाणे बोलतो. सध्या या बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर कावळ्याचा आवाज कर्कश असतो पण माणसांच्या आवाजात काकांना हाक देणाऱ्या कावळा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
हे प्रकरण पालघर जिल्ह्यातील गारगाव गावातील आहे. या गावात मुकणे  कुटुंब वास्तव्यास आहे. हा कावळा मुकणे कुटुंबातील मुलीला तीन वर्षांपूर्वी झाडाच्या खाली पडलेला दिसला. हा कावळा अवघ्या 15 दिवसांचा होता. त्यांच्या मुलीने कावळा घरी आणला आणि त्याचा सांभाळ करू लागले.काहीच दिवसांत तो कुटुंबाचा सदस्य बनला. 
हा कावळा एवढा माणसाळला की तो बाबा, डॅडी , काका असे शब्द बोलतो. अलीकडेच त्याचा काकांना हाक मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.बोलणाऱ्या कावळ्याचा हा व्हिडिओ @sanjay.landge.71 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
 या व्हिडीओ मध्ये एका घरातील दृश्य असून एका बाकड्यावर बसून हा कावळा काका , काका अशी हाक मारत आहे नंतर तो काका आहेत का? अशी हाक मारतो. कावळ्याचे बोलणे ऐकून सर्वच थक्क झाले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आपापली प्रतिक्रिया देत आहे. या बोलणाऱ्या कावळ्याची चर्चा सर्वत्र होत आहे. 
Edited By - Priya Dixit