विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

नवी दिल्ली| Last Modified सोमवार, 10 डिसेंबर 2018 (13:53 IST)
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत सोमवारी ब्रिटनच्या न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. यासाठी सीबीआय आणि अंलबजावणी संचालनालाचे संयुक्त पथक रविवारी ब्रिटनला रवाना झाले आहे. सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई नोहर यांच्या नेतृत्वात हे पथक रवाना झाले आहे. यापूर्वी राकेश अस्थाना यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी होती.
यापूर्वी शुक्रवारी भारताच्या सुप्रीम कोर्टाने मल्ल्याला दणका देताना मालमत्ता जप्त करण्याच्या ईडीच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. तर मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने केंद्राला नोटीस बजावली आहे. यासंदर्भात कोर्टाने केंद्राचे मत मागवले आहे.

भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून मल्ल्या परदेशात पळाला असून ईडीने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ईडीला मल्ल्याची भारतातील मालमत्ता जप्त करायची असून फरार घोषित केल्याशिवाय त्याची मालमत्ता जप्त करता येणार नाही. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएएलए) स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात ईडीने अर्ज केला आहे. यात मल्ल्या फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मल्ल्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने मल्ल्याची याचिका फेटाळून लावली होती. शेवटी या प्रकरणी मल्ल्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.


यावर अधिक वाचा :

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद पवार
शेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक
मुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त
बारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा आदेश
रविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...

10 ऑक्टोबरला मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची घोषणा

10 ऑक्टोबरला मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची घोषणा
मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य ...

शरद पवारांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही

शरद पवारांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याचं ...

मनसे विचारते 'केम छो वरळी...'

मनसे विचारते 'केम छो वरळी...'
मुंबईत झालेल्या सततच्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. दक्षिण मुंबईतील वरळीतही ...

मोबाइल SIM कार्डशी संबंधित हे नियम बदलले, घरून कार्य करणे ...

मोबाइल SIM कार्डशी संबंधित हे नियम बदलले, घरून कार्य करणे सोपे होईल
कंपन्यांना सिमकार्ड घेणे आणि एक्टिवेट करणे आणि कर्मचार्यां ना देणे सोपे झाले आहे. ...

मराठा समाजाची राज्यव्यापी गोलमेज परिषद संपन्न, १५ ठराव

मराठा समाजाची राज्यव्यापी गोलमेज परिषद संपन्न, १५ ठराव मंजूर
सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी ...