शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (09:10 IST)

पैसे वाचविले, कपडे कधीच धुतले नाही, अशी ‘कंजूस अब्जाधीश’

अमेरिकेत शेअर बाजारातील उत्तम गुतंवणूकदार असलेल्या हेनेरिटा हाँलैंड उर्फ हेट्टी ग्रीन या महिलेला जगाकडून ‘कंजूस अब्जाधीश’अशी ओळख मिळाली होती. या महिलेने साबणाचे पैसे वाचवण्यासाठी स्वतःचे कपडे कधीच धुतले नाही, असे फोर्ब्जच्या अहवालात म्हटले आहे.
 
हेट्टी नेहमी थंड पाण्याने आंघोळ करायची कारण गरम पाण्यासाठी हिटर किंवा गिझर वापरावा लागला असता. त्यामुळे वीजबिल वाढले असते. एवढेच नाही तर हेट्टी यांच्या मुलाच्या दातांना कीड लागली तेव्हा त्याला डॉक्टरकडे नेण्याऐवजी हेट्टीने त्यावर घरगुती उपचार करून डॉक्टरकडे जाण्याचे पैसे वाचवले. हेट्टी नेहमी गरीब असल्याचे भासवायची. तिने कधीही चांगल्या दर्जाचे ब्रँडेड कपडे वापरले नाहीत. तसेच त्यांचे राहणीमानही खालच्या दर्जाचे होते. त्यांचे राहणीमान बघून अनेकांना त्यांची दया येत होती. मात्र, त्यांना माहित नव्हते की, आपल्याला ज्या महिलेची कणव वाटत आहे, ती वॉल स्ट्रीटमधील सर्वात मोठी गुंतवणूकदार आहे. हेट्टी यांच्या गुतंवणूक धोरणानुसार आजही शेअर बाजारात गुंतवणुकीच्या टिप्स दिल्या जातात. हेट्टी यांना वडिलांकडून ५० लाख डॉलरची संपत्ती मिळाली होती. तर १९१६ मध्ये हेट्टी यांचे निधन झाले, त्यावेळी त्यांच्याकडे १० कोटी डॉलरची संपत्ती होती.