छोटा शकीलला झटका; साथीदाराचे प्रत्यार्पण
भारताला अनेक गुन्ह्यांमध्ये हवा असलेला डी कंपनीचा सदस्य आणि छोटा शकीलचा जवळचा सहकारी मोहम्मद सलीम ऊर्फ मुन्ना झिंग्रा याला भारतात आणण्याचा मार्ग सुकर झाला आहे. कारण, थायलंडच्या कोर्टाने झिंग्राच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदील दिला आहे. सबळ पुराव्याअंती झिंग्रा हा पाकिस्तानचा नागरिक असल्याचा पाकचा दावा फेटाळत तो भारताचाच नागरिक असल्याचे सांगत कोर्टाने हा निर्णय दिला आहे. पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा सहकारी असलेला मुन्ना झिंग्रा हा सध्या सप्टेंबर 2000 पासून बँकॉकच्या तुरुंगात असून त्याच्या नागरिकत्वावरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद सुरु होता.