शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 8 ऑगस्ट 2018 (16:01 IST)

शब्दाने केला चमत्कार, 24 तासांतच महिलेने डोळे उघडले

अमेरिकेतील फिनिक्स शहरात एका महिलेला प्रसूतीवेळी ती ‘क्लिनिकली डेड’ म्हणजे मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याच स्थितीत ऑपरेशन करून बाळाचा जन्म झाला. त्यावेळी पत्नीला शेवटचे ‘गुडबाय’ म्हणण्यासाठी पती तिच्या कानात म्हणाला, जर तुझ्या आयुष्यात काही संघर्ष उरला असेल तर तू लढ! हे म्हटल्याच्या फक्त 24 तासांतच महिलेने डोळे उघडले!
 
फिनिक्सचे रहिवासी डॉज आणि मलेनिया आपल्या दुसर्‍या मुलाच्या जन्माच्या तयारीत होते. प्रसूती कळा सुरू झाल्या. तेव्हाच तिची प्रकृती बिघडली. मलेनियाच्या हृदयाची धडधड अचानक बंद झाली. ती एम्निऑटिक फ्लूड एम्बॉलिज्मने ग्रस्त होती. डॉक्टरांनी तिला ‘क्लिनिकली’ मृत घोषित केले. डॉज म्हणाला, ‘या स्थितीत डॉक्टरांनी ऑपरेशनच्या माध्यमातून प्रसूती केली. या सर्वांदरम्यान मला नेहमी हेच वाटत होते की, माझी पत्नी मला सोडून जाणार आहे. डॉक्टर सतत तिला श्‍वास देण्याचा प्रयत्न करत होते; परंतु काहीच परिणाम होत नव्हता.डॉक्टरांनी डॉजला सांगितले की, आता तिला गुडबाय म्हणण्याची वेळ आली आहे. तेव्हा तो आपल्या पत्नीजवळ शेवटचे गुडबाय म्हणण्यासाठी गेला आणि हळूच तिच्या कानात काही शब्द म्हणाला. यानंतर जणू काही या शब्दांनी मलेनियाला ताकदच दिली. जवळजवळ 24 तासांनंतर मलेनियाने आपले डोळे उघडल.