शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

दीर्घायुषी होण्यासाठी कामातून सुट्टी घेणे आहे गरजेचे

आपल्याला दीर्घायुष्य लाभावे, असे सगळ्यांनाच वाटते. तुमचीही अशी इच्छा असेल तर तुम्हाला आपल्या कामातून काही दिवस सुट्टी घेऊन सहलीला जाण्याची गरज आहे, असा खुलासा एका नव्या अध्ययनातून झाला आहे. तब्बल 40 वर्षे सुरू असलेल्या या अध्ययनातून असे समोर आले आहे की, ज्या लोकांनी वर्षभरात तीनआठवड्यांपेक्षा कमी सुट्टी घेतली, त्यांच्या मृत्यूची शक्यता सुट्टी घेणार्‍या लोकांच्या तुलनेत तिप्पट जास्त होती. फिनलँडमधील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकीचे प्राध्यापक टीमो स्ट्रँडबर्ग यांनी सांगितले की, तुमची जीवनशैली हेल्थी आहे व तुम्ही आपल्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेता. त्यामुळे सुट्टी न घेता सतत घेतलेली कठोर मेहनत तुम्हाला काहीच हानी पोहोचवत नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, दीर्घायुष्य व तणावातून सुटका हे मुद्दे येतात तेव्हा फक्त आरोग्यदायक आहार व नियमित व्यायामच पुरेसा नाही. त्यासाठी तुम्हाला कामातून सुट्टी घेणे गरजेचे आहे. 1970मध्ये या अध्ययनाची सुरुवात झाली होती. त्यात 1919 ते 1934 दरम्यान जन्मलेल्या 1,200 मध्यमवयीन लोकांचा समावेश करण्यात आला होता. या सगळ्यांना उच्च रक्तदाब, धू्म्रपान व लठ्ठपणामुळे ह्रदयविकाराचा धोका होता. अध्ययनात सहभागी 50 टक्के  लोकांना व्यायाम, खाण्यापिण्याची पथ्ये, व्यसनमुक्ती व वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला.