गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2024 (11:45 IST)

निवडणुकीत मतदान न केल्यास बँकेतून 350 रुपये कापले जातील?" या व्हायरल पोस्ट

सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले आहे. या महिन्यात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याबाबतची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. राजकीय पक्ष आपापल्या परीने विजय मिळविण्यासाठी प्रचार करत आहेत. जनतेने आपल्या बाजूने कौल द्यावा म्हणून राजकीय पक्ष आश्वासनाचा पाऊस करत आहेत.
 
राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. यात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्याचे 7 मे, चौथ्या टप्प्याचे 14 मे आणि पाचव्या टप्प्याचे मतदान 20 मे रोजी होणार आहे. तसेच निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.
 
याचदरम्यान लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जे मतदार लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाहीत, त्यांच्या बँक खात्यातून निवडणूक आयोगाकडून 350 रुपये कापले जातील.  
 
बँक खात्यातून 350 रुपये कापले जाणार?
या पोस्टनुसार, जर कोणत्याही मतदाराने त्याच्या मताधिकाराचा वापर केला नाही तर त्याच्या खात्यातून 350 रुपये कापले जातील. सर्व मतदारांना सक्तीने मतदान करावे लागेल, असे त्यात म्हटले आहे. अन्यथा त्यांच्या खात्यातून 350 रुपये कापले जातील.  
 
हा दावा पूर्णपणे खोटा आहे
मात्र जेव्हा या दाव्याची सत्यता पडताळून पाहिली असता त्यातील सत्य काही वेगळेच असल्याचे समोर आले. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबीने आपल्या तपासणीत म्हटले आहे. पीआयबीने म्हटले आहे की, भारताच्या निवडणूक आयोगाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशा बातम्या शेअर करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
 
Edited By- Ratnadeep ranshoor