घरीच करता येणार मतदान?
काही लोकांना यावेळी देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत घरातून मतदान करता येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. नवी दिल्लीत लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे. मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधांची आणि निवडणुकीची तयारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे माहिती देत आहेत. तसेच राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याआधी एक मोठी घोषणा केली. इतिहासात प्रथमच देशाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोग लोकांच्या घरी जाऊन मत घेणार आहेत. ज्या व्यक्तीचे वय ८५ पेक्षा जास्त आहे तसेच ज्यांना ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आहे. आयोगाचे कर्मचारी अशा व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांचे मत घेतील. अशा व्यक्ती फॉर्म डीच्या माध्यमातून मत देऊ शकतील. राजीव कुमार यांनी माहिती दिली. ज्यांच्या घराजवळ मतदान केंद्र आहे तेच मतदान करत नाहीत असे अनेकदा दिसून येते. अशा लोकांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत.१७व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपणार आहे. काही विधानसभांसाठी निवडणुका होतील यात जम्मू्-काश्मीरचा देखील समावेश आहे. तसेच लोकसभेसाठी ९७ कोटी मतदार पात्र आहेत. १.८२ कोटी नवे मतदार आहेत.
Edited By- Dhanashri Naik