सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 16 मार्च 2024 (09:18 IST)

प्रकाश भाऊ पोहरे हे ‘विदर्भ जॉइंट अक्शन कमेटी’कडून लोकसभा निवडणूक लढवणार

election
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाची उमेदवारी, महायुती कधी जाहीर करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. आपल्या भावी खासदारांचे संदेश त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. महाविकास आघाडी शिवसेना उबाठाकडून लोकसभेसाठी संजय देशमुख यांना हिरवा कंदील दिला असल्याने, त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून विदर्भवादी शेतकरी नेते,  लोकनेता प्रकाश भाऊ पोहरे हे (‘विदर्भ जॉइंट अक्शन कमेटी’कडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.
 
अजूनही (Mahayuti) महायुतीकडून उमेदवारीच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. महायुती भाजपाकडून निलय नाईक, माजी मंत्री येरावर, सौ. अलंक्रीतताई राठोड, राजु राजे पाटील, शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री संजय राठोड, विद्यमान खासदार भावना गवळी, कु. दामिनीताई संजय राठोड व अजित पवार गटाकडून मोहीनीताई नाईक, चंद्रकांत ठाकरे यांची नावे चर्चेत आहेत. सर्वच पक्षाचे भावी खासदार (Washim-Yavatmal LokSabha) यवतमाळ व वाशीम, या दोन्ही जिल्हा कार्यक्रमाला हजेरी लावत, उमेदवारी मलाच मिळणार अशी बतावणी करत प्रचार करीत आहे. निवडणुक जाहीर होऊन आदर्श आचार संहिता लागण्याची वेळ जवळ आली असतानाही, (mahayuti) महायुतीची उमेदवारी जाहीर होत नसल्याने भावी खासदार उमेदवारासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा जीव टांगणीला लागला असून, मतदार जनताही उमेदवारी बाबत संभ्रमात पडली आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor