शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 5 मे 2024 (16:31 IST)

पोलिसांच्या गोळीने हेमंत करकरे यांचा मृत्यू, या काँग्रेस नेत्याचं खळबळजनक वक्तव्य!

vijay vadettiwar
महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशवाद्याच्या गोळीने नव्हे तर पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाला. ही गोष्ट लपवून ठेवण्यात आली आणि देशद्रोही उज्ज्वल निकम आहे. असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

अशा गद्दाराला भाजपने तिकीट दिले आहे. भाजप देशद्रोहींना पाठीशी घालणारा पक्ष आहे का असा प्रश्न येत आहे. 
भाजपने उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांचे तिकीट रद्द करून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. उज्ज्वल निकम हे वकील असून यांनीच कसाबला फाशीची शिक्षा दिली. उज्ज्वल निकमच्या विरोधात वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यांनंतर चांगलाच गदारोळ झाला आहे. 

या वर भाजपनेते आणि उपमुख्यमंत्री यांनी विजय वडेट्टीवार यांना सडेतोड उत्तर दिले. 
फडणवीस म्हणाले, निकम सारख्या देशभक्ताला आम्ही भाजपचे तिकीट दिले आहे. विरोधी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की उज्ज्वल निकम यांनी कसाबची बदनामी केली. या नेत्यांना मुंबईत बॉम्बस्फोट करण्याऱ्या कसाबची काळजी कशाला? आमची युती उज्ज्वल निकम यांच्याशी असून त्यांची युती महाविकास आघाडी अजमल कसाब सोबत आहे. आता जनतेने कोणाच्या पाठीशी उभे राहायचे हे तुम्हीच ठरवायचं आहे. उज्ज्वल निकम यांनी दहशतवाद्याला फासावर नेले. अशा उज्ज्वल निकम यांना ते देशद्रोही म्हणत आहे. ज्या प्रकारे काँग्रेसचे राजकारण सुरु आहे. त्या वरून भाजपचा विरोध दिसून येत आहे. आज पाकिस्तानचा समर्थन काँग्रेसला आहे.   
 
Edited By- Priya Dixit