शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2024 (14:57 IST)

राहुल गांधींनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला

rahul gandhi
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळच्या वायनाड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल गांधी पुन्हा एकदा वायनाड लोकसभा मतदारसंघातून  निवडणूक लढवत आहे. त्यांनी बुधवारी 3 एप्रिल रोजी वायनाडमधून  दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांची बहीण प्रियांका गांधी सोबत होत्या. 

उमेदवारी दाखल करण्यापूर्वी त्यांनी वायनाडमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या रोड शोमध्ये जवळपास हजारो लोक सहभागी झाले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाडमधून चार लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता.त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पीपी सनीर यांचा पराभव केला होता. यंदा केरळ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राहुल गांधी आणि त्यांची बहीण सकाळी 10:45 वाजता हेलिकॉप्टरने कन्नूरला आले. त्यांचे स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. 

राहुल गांधींच्या या रॅलीमध्ये त्यांची बहीण प्रियंका गांधी यांच्याशिवाय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि दीपा दास, AICC ची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) प्रभारी कन्हैया कुमार, राज्यातील विरोधक विधानसभा सदस्य व्ही.डी. सतीसन आणि केपीसीसी (केरळ प्रदेश काँग्रेस कमिटी) कार्याध्यक्ष एमएम हसन उपस्थित होते.
 
 Edited by - Priya Dixit