शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 13 मे 2024 (18:18 IST)

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या चौथ्या टप्प्यात देशातील 10 राज्यांमध्ये 96 जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआरसीपीच्या एका आमदाराचा मतदानादरम्यानचा व्हिडिओ समोर आला आहे.वास्तविक, व्हीआयपी कल्चरचा फायदा घेण्यासाठी आमदार मतदानाच्या रांगेकडे दुर्लक्ष करत पुढे जात असताना एका मतदाराने त्याला आक्षेप घेतला. आमदार दुखावले आणि मतदाराला कानशिलात लगावली.या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 
 
व्हिडीओ मध्ये आमदार मतदान केंद्रावर मतदाराच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे वायएसआरसीपी नेते व्हीएस शिवकुमार आहेत, जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. हा मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओ मध्ये आंध्रप्रदेशच्या आमदाराचा काही मुद्द्यावरून मतदाराशी वाद झाला . आमदार रांगेत उभे असलेल्या मतदारा पर्यंत गेले आणि त्यांनी मतदाराला जोरदार कानशिलात लगावली. घटनेनंतर उपस्थित आमदाराचे समर्थक तिथे पोहोचले आणि त्यांनी मतदाराला मारहाण करायला सुरु केले.
हा व्हिडीओ भाजपने शेअर केला असून आमदाराच्या कृत्याला उद्धटपणा आणि गुंडगिरी असे म्हटले आहे. सोशल मीडियावर आमदारावर जोरदार टीका होत आहे. 

आंध्र प्रदेशातील सर्व लोकसभा जागांवर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याबरोबरच राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होत आहे. 
 
Edited by - Priya Dixit