मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वार्ता|

कॉंग्रेस-भाजपवर मायावतींची तोफ

गरिबांच्या घरी जेवन केल्याने आणि त्यांच्या घरी मुक्काम केल्याने गरिबीचा प्रश्न सुटत नसतो असा टोमणा कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांना लगावत कॉंग्रेस आणि भाजप हे गरिबांविरोधी पक्ष असल्याचा आरोप बसपा नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी केला आहे.

बलिया येथे झालेल्या प्रचार सभेत मायावती यांनी कॉंग्रेस आणि भाजपवर तोफ डागली.

देशात गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद वाढला असून, बेकारी आणि बेरोजगारी वाढवण्‍यात कॉंग्रेसचा हात असल्याचा आरोप मायावतींनी केला.

उत्तर प्रदेशमध्ये सर्वांना समान वागणूक देण्यात येत असून, राजा-महाराजांचे कुटूंब असो किंवा गांधी कुटूंब सर्वांना कायदा मोडल्यानंतर आपण शिक्षा केल्याचे सांगतानाच त्यांनी भाजप नेते वरुण गांधी यांच्यावर लावण्यात आलेल्या रासुकाचे समर्थन केले.