चवथ्या टप्प्यातील निवडणूक अधिसूचना जारी
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी अधिसूचना जारी केल्यानंतर चवथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. चवथ्या टप्प्यात 8 राज्यांमध्ये 85 लोकसभा मतदार संघात निवडणुका होणार आहेत. यात 7 मे रोजी राजस्थानातील 25 जागा, उत्तर प्रदेशात 18, पश्चिम बंगालमध्ये 17, हरियाणात 10, दिल्लीमध्ये 7, पंजाब 4, बिहार 3 आणि जम्मू-कश्मीरमध्ये एका जागेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली असून ती 18 एप्रिलपर्यंत चालणार आहे.