शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र
Written By चंद्रकांत शिंदे|

कोण आहे रे तिकडे

PR
मोहन आगाशे यांच्या अनोख्या भूमिकेने नटलेला कोण आहे रे तिकडे चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या भूमिकेद्वारा डॉ. मोहन आगाशे यांनी आपल्या अभिनयाच्या शिदोरीत आणखी एका वेगळ्या भूमिकेची नोंद केली आहे. हा चित्रपट नावावरून भयपट वाटत असला तरी हा चित्रपट भयपट नसून मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा आहे.

अंबिका पिक्चर्स निर्मित या चित्रपटाचे निर्माते आहेत दीपक भोसले, रमेश शर्मा आणि शैजू नाम्बियाद. चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तानाजी एम. घाडगे ज्यांनी यापूर्वी एकदा काय झालंङ्क्त बायको उडाली भुर्र या चित्रपटांबरोबरच घरकुल, पंखाची सावली, अनुपमा, उज्ज्वल प्रभात, अनुपमा, सप्तपदी आणि ब्रहमांडनायक या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

डॉ. मोहन आगाशे यांच्याबरोबर सुबोध भावे, मोहन जोशी, शरद पोंक्षे, शुभांगी गोखले, हेमांगी कवी आणि भारत गणेशपुरे यांनी भूमिका साकारल्या आहेत. कथा-पटकथा-संवाद-गीत अरविंद जगताप यांनी लिहिलेले असून संगीत चिनार महेश यांचे आहे.